खारघर : रामप्रहर वृत्त
सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साईकृपा मित्रमंडळ खारघर यांच्या वतीने गुरुवारी शलेय विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप आणि रायटिंग पॅड वाटप करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम खारघर गाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बांधण्यात आलेल्या कट्ट्याचे सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील, प्रभाग समिती अ चे अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, नगरसेवक नीलेश बाविस्कर, नरेश ठाकूर, नगरसेविका अनिता पाटील, आरती नवघरे, हर्षदा उपाध्याय, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, तालुका चिटणीस वासुदेव पाटील, सांस्कृतिक सेलचे कीर्ती नवघरे, शहर सरचिटणीस दीपक शिंदे, शिवमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गजानन पाटील, भाजप नेते यशवंत पाटील, अनंता तोडेकर, जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस समीर कदम, महिला मोर्चाच्या सरचिटणीस बिना गोगरी, मोना अडवाणी, अंकिता वारंग, प्रतीक्षा कदम, आशा शेडगे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.