उरण : वार्ताहर
दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शंभर दिवस स्वस्थ (एसएचजी) परिवारानुसार पोषण अभियान कार्यक्रम उरण नगर परिषद येथे बुधवार (दि. 12) रोजी घेण्यात आला.
या वेळी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे अधिपरिचारिका नेहा चव्हाण, आरोग्य सेवक मोहन जगताप, आरोग्य सेविका निवेदिता कोटकर, माविमच्या कविता म्हात्रे, दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानचे प्रमुख संजय पवार व महिला वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता म्हात्रे यांनी केले.
या अभियानात पोषण आहार, गरोदर माता, लहान मुले यांच्या आहाराविषयी माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे समतोल आहारामध्ये लोह, कॅल्शियम, जीवनसत्वे, प्रथिने, स्निग्ध पदार्थ यांचा समावेश करावा व त्यासंबंधी मार्गदर्शन इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे अधिपरिचारिका नेहा चव्हाण यांनी दिले.