Breaking News

उ. रायगड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चातर्फे क्रीडा स्पर्धा

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य

पनवेल : रामप्रहर वृत्त
समाजसेवेबरोबरच क्रीडा क्षेत्राला महत्त्व देणारे पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जिल्ह्यात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
युवा नेते परेश ठाकूर यांना क्रीडा क्षेत्राची आवड आहे. मॅरेथॉन, टेनिस, बॅडमिंटन, कबड्डी, फुटबॉल अशा विविध क्रीडा स्पर्धांचे ते भव्य आणि उत्कृष्ट नियोजनात आयोजन करीत असतात. त्यांची क्रीडाविषयी आत्मियता पाहता त्यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चाच्या वतीने खेलो युवा- स्पोर्ट्स मूमेंट या शीर्षकाखाली फुटबॉल, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने 17 व 18 मे रोजी कामोठे येथे तालुकास्तरीय कबड्डी लीग, 20 मे रोजी कळंबोली येथे जिल्हास्तरीय खो- खो, तसेच खारघर येथे व्हॉलीबॉल, 20 व 21 मे रोजी पनवेल येथे फुटबॉल स्पर्धा अशा सर्व प्रकाशझोतात आयोजित करण्यात आली आहे.
फुटबॉल स्पर्धा पुरुष गटात होणार असून या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास 50 हजार रुपये, द्वितीय क्रमांकास 25 हजार तर तृतीय क्रमांकास 10 हजार रुपये, खो-खो स्पर्धा पुरुष व महिला या दोन गटात होणार असून प्रथम क्रमांकाला पाच हजार रुपये, द्वितीय तीन हजार, तृतीय दोन हजार तर चतुर्थ क्रमांकास एक हजार रुपये, कबड्डी स्पर्धा पुरुष गटात होणार असून प्रथम क्रमांक 21 हजार 111 रुपये, द्वितीय 11 हजार 111 रुपये तर तृतीय क्रमांक 5,555 रुपये, व्हॉलीबॉल स्पर्धा पुरुष गटात असून प्रथम क्रमांक 21 हजार 111 रुपये, द्वितीय 11 हजार 111 रुपये तर तृतीय क्रमांक 5,555 रुपये तसेच सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

युवा नेते परेश ठाकूर हे खेळ आणि खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहित करत असतात. युवा पिढीने मैदानी खेळाकडे वळावे आणि आरोग्य सुदृढ ठेवावे हा त्यांचा अट्टाहास असतो. त्या अनुषंगाने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
– मयुरेश नेतकर, अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply