पनवेल ः बातमीदार
स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती करण्याचा आनंद मिळावा आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचा प्रसार हे उद्दिष्ट ठेवून खांदा कॉलनीमध्ये गणेशमूर्ती कार्यशाळेचेे आयोजन करण्यात आले. येथील प्रसिद्ध गणेशमूर्तीकार पद्मजा कुलकर्णी यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले. त्यांच्यासह सुमीत वाघुळकर यानी सहभागींना मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांबरोबरच युवक व ज्येष्ठ नागरिकही मोठ्या उत्साहाने या कार्यशाळेत सहभागी झालो होते.
या कार्यशाळेत शाडूपासून गणपतीची मूर्ती कशी तयार केली जाते, त्यासाठी टूल्सचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच मूर्तीची प्रमाणबद्धता, आखीवरेखीवपणा आणि मूर्तीचे सौंदर्य आणि तेज वाढविण्याच्या दृष्टीने मूर्ती कशा घडवाव्या, याचे मार्गदर्शन करण्यात आले.
स्वतःच्या हाताने मूर्ती साकारण्याचा आनंद विद्यार्थ्यांना मिळतो. पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याबाबत जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या कार्यशाळेत गणपतीचे विसर्जन घरच्या घरी कसे करावे, याचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात येते.
– पद्मजा कुलकर्णी , कार्यशाळा संचालिका