पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, पनवेल वकीस संघटनेचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. त्यांच्या माध्यमातून वाढदिवसाचे औचित्यसाधून नवीन पनवेल येतील भागीरथी सदन या जनसंपर्क कार्यालयात आधार कार्ड शिबीराचे 7 आणि 8 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात आधार नोंदणी, आधार अपडेट करण्यात आले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे सर्वसामान्यांना मदत करण्याचे ध्येय्य समोर ठेऊन अॅडव्होकेट मनोज भुजबळ यांनी हा उपक्रम राबवला. या शिबिराला नागरीकांना उदंड प्रतिसाद लाभला असून शिबीराचे आयोजन केल्याबद्दल नागरीकांनी अॅड. मनोज भुजबळ यांचे आभार मानले.दरम्यान, भारतीय जनता पक्ष हा जनसेवेसाठी सदैव झटणारा पक्ष असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ आधार कार्ड शिबिरावेळी केले.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …