Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त  पनवेल कोळीवाड्यातील शिल्पाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल शहरातील कोळेश्वर चौक अर्थात उरण नाक्यावर श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने ‘दर्याचा राजा कोळी’ हे शिल्प उभारण्यात आले आहे. या शिल्पाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 2) लोकार्पण झाले. या वेळी त्यांनी प्रत्येकाला अभिमान वाटेल असे पनवेल महापालिकेचे चित्र तयार झाले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

पनवेल शहरातील उरण नाक्यावर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून ‘दर्याचा राजा कोळी’ हे शिल्प उभारण्यात आले असून, या शिल्पाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 71व्या वाढदिवसाचे औचित्यसाधून लोकार्पण करण्यात आले.

या वेळी ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती अ‍ॅड. वृषाली वाघमारे, नगरसेवक अनिल भगत, मनोज भुजबळ, नितीन पाटील, राजू सोनी, मुकीद काझी, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, हारू भगत, गणेश भगत, अ‍ॅड. जितेंद्र वाघमारे, कर्णा शेलार, जवाद काझी, चिन्मय समेळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने कोळेश्वर कोळीवाडा चौकात आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली चांगले शिल्प तयार झाले आहे. त्यामुळे पनवेलच्या सौंदर्यात आणखी भर पडली असून, प्रत्येकाला अभिमान वाटावे असे पनवेल महापालिकेचे चित्र तयार झाले असे मत व्यक्त केले.

पनवेलचे खरे हक्कदार कोळी समाज आहे. त्यांना समाजाच्या द़ृष्टीने हक्काचे चौक मिळाले आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजप नेत्यांचे व त्यांना साथ देणार्‍यांचे अभिनंदन. -लोकनेते रामशेठ ठाकूर

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply