Breaking News

डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद

मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांचे प्रतिपादन; शासकीय दाखले वाटप कार्यक्रम

रोहे ः प्रतिनिधी

दाखले वाटप शिबिरात आज अनेकांना विविध शासकीय दाखले देण्यात आले. त्यासाठी श्री सदस्यांनी घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांची माहिती संकलन केली होती. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सर्वच उपक्रम स्तुत्य असून त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन रोहा नगर परिषदेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी येथे केले.  डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रोहे मंगलवाडी येथील डॉ. सी. डी. देशमुख माध्यमिक कन्या शाळेत विविध शासकीय दाखले वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण बोलत होते. प्रतिष्ठानच्या वतीने विविध शासकीय दाखले वाटप कार्यक्रम होत असून, त्यासाठी 1040 श्री सदस्यांनी 135 गावांतून सर्व्हे केला. आज प्रातिनिधिक स्वरूपात दाखले देण्यात येत असून तालुक्यात 3875 अधिवास व वयाचे दाखले घरपोच देण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे गिरीष मोरे यांनी प्रास्ताविकात दिली. नायब तहसीलदार मानसी साठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. अंकीता मते खैरकर, शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योत्स्ना कदम यांनीही डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले.

प्रतिष्ठानचे संजय पांचाळ, अजिंक्य मोरे, वैभव मुढे यांच्यासह श्रीसदस्य, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नितीन मोरे यांनी आभार मानले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply