Breaking News

कर्जत नगर परिषदेतर्फे जनजागृती मोहीम

कर्जत : प्रतिनिधी

जीवघेण्या कोरोना विषाणूबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून कर्जत नगर परिषदेच्या वतीने जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कोरोना प्रतिबंधका काय काळजी घ्यायची याबाबत माहिती पत्रके वाटण्यात आली. नगर परिषदचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगरसेवक, कर्मचारी यांनी कर्जत शहराच्या मुख्य बाजार पेठेत फिरून जनजागृती केली. बाजारपेठेत जनजागृती दर्शवणारे सहा फलक लावण्यात आले आहेत, तसेच व्यापार्‍या समवेत बैठकी घेण्यात आल्या. खबरदारी म्हणून घ्यावयाच्या उपाय योजनाबाबत माहिती पत्रकाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. साबण व पाणी वापरून आपले हात स्वच्छ धुवा, शिंकताना व खोकताना आपल्या नाकावर व तोंडावर रुमाल धरा, सर्दीची लक्षणे असलेल्या लोकांशी नजीकचा संपर्क टाळा, मांस आणि अंडी पूर्णपणे शिजवून व उकडून घ्या, जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकट संपर्क टाळा अशा आशयाचे माहितीपत्रक छापण्यात आले आहे. नगर परिषदेच्या वतीने शहरात साफसफाई सुरू असून जंतुनाशक, धूर फवारणी करण्यात येत आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात निर्माण होणार्‍या जैविक कचर्‍याची विल्हेवाट लावण्यास मुंबई वेंटर मॅनेजमेंट यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सदरचा कचरा त्यांच्या प्रकल्पात शास्त्रयुक्त पद्दतीने विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती देवून मुख्याधिकारी डॉ. पाटील यांनी, हॉटेल्स, मॉल अशा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply