Breaking News

कळंबोली समाजमंदिर व आरोग्य विभागाच्या पुवर्विकासाची मागणी

पनवेल : वार्ताहर

गेल्या 15 दिवसांपासून कळंबोली समाजमंदिर मनस्वी सेंटर व आरोग्य विभागाचा कारभार अंधारातच चालू आहे. त्यातच या इमारतीतील मीटर बॉक्सजवळ पाणी भरल्याने शॉर्टसर्किट होऊन जीवितहानी होईल हे टाळण्यासाठी विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. या सर्व मनमानी कारभाराचा स्त्री शक्ती फाऊंडेशनने संबंधित अधिकार्‍यांना जाब विचारून येथील कार्यालय लवकरात लवकर स्थलांतरित करावे व नव्या इमारतीत पुर्नविकास करावा, अशी मागणी केली आहे. स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या विजया कदम व शुभांगी निर्मळे यांना समाजमंदिर मनस्वी सेंटर व आरोग्य विभागाच्या दयनीय अवस्थेबाबत माहिती मिळताच महानगरपालिकेचे फार्मासिस्टर महालये, श्रीमती बर्फे, येवले, जगताप, तसेच वीज वितरण कंपनीचे सोनावणे यांना याबाबत विचारणा केली. येथील अंधारमय कारभारामुळे त्याचा नाहक त्रास नागरिकांना होत आहे, तसेच एखादी दुर्घटनासुद्धा घडू शकते. हे टाळण्यासाठी लवकरात लवकर हे कार्यालय स्थलांतरित करावे व नव्या इमारतीत पुर्नविकास करावा, अशी मागणी स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या विजया कदम व शुभांगी निर्मळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महानगरपालिका, तसेच सिडको अधिकार्‍यांना संबंधित मागणीचे निवेदन दिले आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply