Breaking News

कोयना पुनर्वसित समाजाकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी

कोयना पुनर्वसाहत मराठा समाज सेवा संघ, रायगड ठाणे पालघर यांच्या व जिल्ह्यातील विविध मंडळांच्या सहकार्याने रायगड जिल्ह्यातील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

लॉकडाऊन काळात समाजातील अनेक गरजूंचे उपजीविकेचे साधन बंद झाल्याने व समाजातील मोलमजुरी करून आपले पोट भरणार्‍या समाज बांधवांना कार्यकारिणीने कोरोना व्हायरस मदत निधीच्या माध्यमातून किराणा साहित्याचे वितरण करण्याबाबतचा सूचना रायगड जिल्हा कार्यकारिणीला प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने खालापूर तालुक्यातील कारगाव विभागामध्ये त्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास समाजाचे कार्याध्यक्ष राजाराम मुसळे, ग्रुप ग्रामपंचायत उबरेचे सरपंच देवयानी साळुंखे, विभाग अध्यक्ष किसन भोसले, उपाध्यक्ष मधु चव्हाण, कार्याध्यक्ष राजू साळुंखे, दिनेश मुसळे, सचिव आदी उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply