Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विजय निश्चित

शिवसेना उपजिल्हा संघटक परेश पाटील यांचा विश्वास

कळंबोली ः वार्ताहर

पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी युती सरकारच्या माध्यमातून पनवेलचा केलेला विकास हेच त्यांच्या विजयाचे गमक असून त्यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी शिवसैनिक आकाशपाताळ एक करीत असून त्यात आम्ही यशस्वी होऊ, असा आत्मविश्वास शिवसेना उपजिल्हा संघटक परेश पाटील यांनी व्यक्त केला.

महायुती सरकारच्या माध्यमातून सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमध्ये विकासगंगा आणली आहे. मोठ्या प्रमाणात पनवेलचा विकास होत असून पनवेलला सुजलाम् सुफलाम् बनविण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे. ज्या पनवेलमधील भाजप नेत्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना मोठ्या फरकाने विजयी केले, त्यापेक्षा जास्त मतांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करू, असे परेश पाटील यांनी सांगत आमचे सगळे पदाधिकारी जोमाने कामाला लागल्याचे सांगितले. शिवसेना सल्लागार बबन पाटील यांच्यावर जरी कर्जत विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली असली, तरी त्यांचे पनवेलकडे बारकाईने लक्ष आहे, असेही ते म्हणाले.

आमदार प्रशांत ठाकूर यांना जास्तीत जास्त मताधिक्य कसे मिळेल, त्या जोमाने शिवसैनिक कामाला लागले आहेत. शिवसेना नेते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांची कळंबोलीतील सभाही जोरात झाली. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारात शिवसेना संपर्कप्रमुख दत्ताजी दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिष घरत, सल्लागार बबन पाटील, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, विधानसभा संघटक दीपक निकम आदींसह सर्व शिवसेना पदाधिकारी ताकद लावून काम करीत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply