पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील विज्ञान विभागाच्या सायन्स असोसिएशनकडून ‘पोस्टर प्रेझेन्टेशन’ हा नावीन्यपूर्ण कार्यक्रम शनिवारी (दि. 12) आयोजित करण्यात करण्यात आला होता. या कार्यक्रमात पोस्टर प्रेझेन्टेशनबरोबर सायन्स असोसिएशन प्रकााशित ‘इसेन्स ऑफ सायन्स’ या मॅगेझिनचे अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी इस्त्रो, मंगलयान, इंटरनेट ऑफ थिंग्जस इत्यादी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि गणित या विषयांवरील पोस्टरचे सादरीकरण केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठातील नॅनो टेक्नॉलॉजी विभागातील शास्त्रज्ञ डॉ. अतुल चासकर यांचे विज्ञान आणि संशोधनाचे महत्त्व, सर्वांगीण विकास यावर बहुमोल मार्गदर्शन लाभले. याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. टी. गडदे आणि उपप्राचार्य शरदकुमार शाहा यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आयोजन हे सायन्स असोसिएशनच्या अध्यक्षा प्रा. स्मिता राऊत, भौतिकशास्त्र विभागप्रमुख यांनी सर्व विज्ञान शाखेच्या विभाग प्रमुखांच्या सहाय्याने केले.
संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर, तसेच व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख यांचे या उपक्रमासाठी मार्गदर्शन लाभले.