Breaking News

पनवेलमध्ये गुरुवारी ’आर्टिकल 370’चा मोफत शो

पनवेल : रामप्रहर वृत्त
देश आणि देशभक्ती या अनुषंगाने काश्मीरवर आधारित ’आर्टिकल 370’ या सत्यघटनेवर आधारित चित्रपटाचा शो 18 ते 25 वयोगटातील नवमतदारांसाठी पनवेलमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोफत आयोजित करण्यात आला आहे. ओरियन मॉलमधील पीव्हीआर सिनेमा येथे गुरुवारी (दि.7) सायंकाळी 7 वाजता हा चित्रपट पहायला मिळणार आहे.
मोफत प्रवेश तिकिटासाठी अभिषेक भोपी (9820702043), वैभव बुवा (9029410699), रोहित जगताप (8691930709) किंवा देवांशू प्रभाळे (8433513540) यांच्याशी संपर्क साधावा तसेच देश आणि देशाचा इतिहास समजून घेण्यासाठी नवमतदारांनी हा चित्रपट अवश्य पहावा, असे आवाहन आयोजक आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply