मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील नागरिकांसाठी एक दिलासादायक वृत्त आहे. सद्यस्थितीत राज्यात कोठेही पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे लांबलेल्या पावसामुळे सुमारे पाच महिन्यांनंतर राज्यात कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे बहुतांश भागातील तापमानात घट होणार असल्याने थंडी अवतरणार असल्याची चिन्हे आहेत. जूननंतर पाच महिन्यांत काही आठवडे वगळता इतर सर्व दिवस पावसाची शक्यता किंवा ढगाळ स्थितीचा अंदाज वर्तवण्यात येत होता. त्यानंतर पहिल्यांदाच कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या तापमानात घट होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत रात्रीचा गारवा वाढण्याची शक्यता आहे.