Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून तलवारबाज विद्यार्थ्यांचे कौतुक

पनवेल : रामप्रहर वृत्त

राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे रविवारी (दि. 10) अभिनंदन केले.हरियाणा येथे नुकतीच राष्ट्रीय स्तरावरील तलवारबाजी स्पर्धा चाचणी घेण्यात आली. यामध्ये खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे अथर्व धारप, ओमकार काळभोर, आशिष गरूड, ओजस पोवार, शिविका शर्मा, आदिती रॉय, सलोनी कुमावत, आर्या रास्कर, ऐश्वर्या भोटकर यांनी चमकदार कामगिरी केली. त्यामुळे त्यांची राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबद्दल या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांना प्रशिक्षण देणारे शिक्षक स्वप्नील मोरे यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुककरून त्यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply