Breaking News

महाराष्ट्राचे दोन्ही संघ जाहीर

अखिल भारतीय नागरी सेवा कबड्डी स्पर्धा

मुंबई : प्रतिनिधी

हिमाचल प्रदेशमधील सिमला येथे 15 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत होणार्‍या अखिल भारतीय नागरी सेवा कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने आपले महिला व पुरुष संघ मंगळवारी (दि. 12) जाहीर केले. महिला संघाचे नेतृत्व शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू सुवर्णा बारटक्के या अनुभवी खेळाडुकडे, तर पुरुष संघाचे नेतृत्व सुरज कांबळेकडे सोपविण्यात आले.

महिला संघात सुवर्णासह स्नेहल साळुंखे (शिवछत्रपती पुरस्कार), सायली जाधव (आंतरराष्ट्रीय पातळी) या कबड्डीतील मुरब्बी व प्रदीर्घ अनुभव असणार्‍या खेळाडू या संघात आहेत. दोन्ही संघ धारावी येथील क्रीडा संकुलात जोरदार सराव करीत होते. दोन्ही संघ बुधवारी दुपारी स्पर्धेकरिता सिमल्याला रवाना होतील, अशी माहिती सचिवालय जिमखान्याचे सचिव श्री. सोनावणे यांनी दिली.

संघ पुढीलप्रमाणे : महिला विभाग-सुवर्णा बारटक्के संघनायिका, स्नेहल साळुंखे, प्रियांका तावडे, सायली जाधव, विद्या सिरास, मनीषा मानकर, कल्पिता शिंदे, माधुरी परब, पूजा मचाले, जयश्री शेटे, अश्विनी थोरवे, स्वाती काकडे, भारती दिवेकर, दीपिका जोसेफ, प्रशिक्षक-दिलीप कडू, व्यवस्थापक-गणेश भोईर.

पुरुष विभाग-सुरज कांबळे संघनायक, नीलेश चिंदरकर, ऋषिकेश डिचोलकर, संतोष जाधव, कल्पेश जाधव, शशांक पवार, सुरेंद्रसिंह मेहरा, महेश सावकारे, विक्रम कदम, महेंद्रसिंह चव्हाण, अंकुश महाले, गणेश काळे, संदीप इंदुलकर, गोरख पवार, प्रशिक्षक-प्रीतम सनकुलकर, व्यवस्थापक-मदन बावसकर.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply