Breaking News

मुरूडमध्ये सापाला जीवदान

मुरूड : प्रतिनिधी

शहरातील साईबाबा मंदिर परिसरात सोमवारी (दि. 11)सकाळच्या सुमारास घोणस जातीचा सव्वाचार फुट लांबीचा  विषारी साप रहिवाशांच्या निदर्शनास आला. रुपेश पाटील या युवकाने सर्पमित्र संदीप घरत यांना पाचारण केले. घरत यांनी या  विषारी सापाला शिताफीने पकडून गोणपाटात बंदीस्त केले आणि  वनखात्याचे अधिकारी प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गारंबीच्या जंगलात नेऊन सोडले.

घोणस उर्फ कांबळ्या जातीच्या विषारी  सापाने चावा घेतल्यास वेळेवर उपचार झाले नाहीत तर व्यक्ति दगावण्याचा धोका असतो. व संपूर्ण शरीराची कातडी सडत जाते.

-संदीप घरत, सर्पमित्र, मुरूड

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply