आपल्या हातातील मोबाईल जितका स्मार्ट बनत चालला आहे, तितके आपण त्यावर अवलंबून राहू लागलो आहोत. आजघडीला कार्यालयीन कामांपासून बँकेच्या व्यवहारांपर्यंतच्या अनेक गोष्टी स्मार्टफोनच्या माध्यमातूनही केल्या जातात. मात्र हे करत असताना स्मार्टफोनला विशेषतः अॅण्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित मोबाईल्सना भेडसावणारा गोपनीयता किंवा सुरक्षिततेचा मुद्दा आपण विसरून जातो. अॅण्ड्रॉईडचा मुख्य आधार असलेले गुगल खाते चुकूनही इतरांच्या हातात पडले तर, त्याचा किती दुरुपयोग होऊ शकतो, याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. त्यामुळे आपल्या गुगल खात्याला द्विस्तरीय सुरक्षा (टू फॅक्टर ऑथंटिकेशन) असणे महत्त्वाचे आहे. द्विस्तरीय सुरक्षा पद्धती अतिशय उपयुक्त आहे. या रचनेमध्ये तुम्ही प्रत्येक वेळी नवीन ठिकाणाहून किंवा नवीन उपकरणावरून गुगल खाते सुरू करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला पासवर्डसोबतच आपल्या मोबाईलवर आलेला सहा अंकी कोडक्रमांकही सोबत टाकावा लागतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला तुमच्या गुगल खात्याचा पासवर्ड माहीत असला, तरी या सहा अंकी कोडशिवाय ती व्यक्ती तुमचे गुगल खाते सुरूच करू शकणार नाही. तुमच्या अॅण्ड्रॉईड स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जाऊन गुगल हा पर्याय निवडा. त्यामध्ये साइन इन अॅण्ड सिक्युरिटीवर क्लिक करा. तुम्ही वेब ब्राऊजरमध्ये जाऊन गुगल अकाऊंट सिक्युरिटी वेबसाइटवरूनही ही प्रक्रिया करू शकता.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …