Monday , February 6 2023

जय बजरंग! पुनियाने नववर्षातील पहिल्याच स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक

रोम : वृत्तसेवा
भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने रोम मालिका क्रमवारीत 65 किलो फ्री स्टाइल वर्गात सुवर्णपदक जिंकले. 2020च्या पहिल्याच स्पर्धेत बजरंगने या पदकासह दणक्यात सुरुवात केली. त्याच्यासह रवी दहीयानेही 61 किलो वजनी गटात खेळताना सुवर्णपदक जिंकले.
बजरंगने अंतिम फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन ओलीचा 4-3ने पराभव केला. या स्पर्धेत महिला गटात विनेश फोगाटने 53 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते. दुसर्‍या सामन्यात रवीने 57 किलोएवजी या स्पर्धेत 61 किलोत सहभाग घेत कझाकस्तानच्या नुर्बोलत अबदुआलीयावर 6-0 वर दणदणीत विजय मिळवला. त्याने पहिल्यांदा मोलदोवाच्या एलेक्झाण्ड्रू चिरतोआका आणि कझाखिस्तानच्या नुरिस्लाम सानायेववर मात केली. वर्ल्ड चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेती दीपक पुनियाचे 86 किलो वजनी गटातच आव्हान संपुष्टात आले. दीपकला सुरुवातीलाच पुएर्टो रिकोच्या इथान एड्रियन रामोकडून 1-11ने पराभव पत्कारावा लागला.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply