Breaking News

उरणमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत

भटक्या कुत्र्यांनी घेतला 13 नागरिकांना चावा
बांधपाडा-खोपटे गावातील रहिवासी भयभित
उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून खोपटा गावातील 13 नागरिकांना चावा घेतल्याची घटना काल रविवारी घडली आहे. या सहा जखमी नागरिक इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण येथे उपचार घेत आहेत. तर सात नागरिक उपचार घेऊन घरी गेले आहेत. तरी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी खोपटा गावातील रहिवाशांनी केली आहे. उरण तालुक्यातील अनेक गावात भटक्या कुत्र्यांची संख्या बळावली आहे.
सदर भटकी कुत्री नागरिकांना चावा घेत आहेत. त्यामुळे गावा गावातील नागरिक भटक्या कुत्र्यांच्या दहशतीत वावरताना दिसत आहेत. त्यातच रानसई आदिवासी गावातील रहिवाशांना कुत्र्यांनी चावा घेतल्याने एकचा दुदैवी मुत्यू झाल्याची घटना घडली होती.तसेच जेएनपीए वसाहतीत डॉक्टर व रहिवाशांना कुत्रा चावल्याची घटना घडली होती. तसेच नूकताच आवरे गावा जवळील जंगलात मुक्त संचार करणार्‍या भेकर जातीच्या वन्यप्राण्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. सध्या उरण तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढत असल्याने अशा कुत्र्यांचा बंदोबस्त लावण्यासाठी संबंधित प्रशासनाने पुढाकार घेतला नाही. अशा भटक्या कुत्र्यांनी खोपटा गावातील 13 नागरिकांना चावा घेतल्याची घटना रविवारी घडली आहे. यातील 6 जखमी उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर 7 रुग्ण उपचार घेऊन घरी गेल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.अशा भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त लावण्याची मागणी भयभीत झालेले बांधपाडा-खोपटे गावातील रहिवासी व्यक्त करत आहेत.

खोपटा गावातील कुत्र्यांचा उच्चांक वाढला आहे.सदर कुत्र्यांनी 13 जणांना चावा घेतला आहे. बांधपाडा-खोपटे गावातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी बांधपाडा ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे.
-विशाखा ठाकूर, सरपंच, बांधपाडा ग्रामपंचायत

Check Also

पनवेलमधील विजेचा प्रश्न निकाली

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दोन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील छत्रपती …

Leave a Reply