Breaking News

कोरोनासंदर्भात अधिक कार्यक्षम व्यवस्था राबवा; आमदार प्रशांत ठाकूर यांची सूचना

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोनो विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक काळजी घेण्याची गरज लक्षात घेऊन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्यासोबत रविवारी (दि. 15) बैठक घेऊन यासंदर्भात महापालिकेच्या माध्यमातून अधिक कार्यक्षम व्यवस्था करण्याची सूचना केली.

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 30च्या वर गेला आहे, तर आतापर्यंत देशात दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल हद्दीतील संशयित तसेच बाधितांना योग्य ते उपचार मिळाले पाहिजेत, यासाठी अधिक कार्यक्षमतेची योग्य व्यवस्था करावी, अशी सूचना करून जनजागृतीवर अधिकाधिक भर देण्याचे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी केले. या बैठकीस महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत आदी उपस्थित होते.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply