Breaking News

आधार केंद्रे आठवडाभर राहणार खुली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशभरातील आधार सेवा केंद्रे आता आठवड्यातील सातही दिवस खुली राहणार आहेत. नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन ’यूआयडीएआय’ने देशभरातील आधार सेवा केंद्रे आठवड्यातील सातही दिवस खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी ही केंद्रे दर मंगळवारी बंद असायची.

’यूआयडीएआय’नं ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. ’यूआयडीएआय’द्वारे सुरू केलेली आधार सेवा केंद्रे आता सातही दिवस खुली राहतील. दररोज 1000 आधार एनरॉलमेंट किंवा रिक्वेस्ट अपडेट करण्याची या आधार सेवा केंद्रांची क्षमता आहे.

पासपोर्ट सेवा केंद्रांच्या धर्तीवर सुरू केलेल्या आधार सेवा केंद्रांवर जाण्यासाठी तुम्ही ऑनलाइन अपॉइंटमेंट घेऊ शकता. आधार केंद्रात नव्या आधार कार्डसाठी अर्ज किंवा एनरॉल करण्यासह तुम्ही यूआयडीएआय डेटाबेसमध्ये नावे, पत्ता, मोबाइल नंबर, ई-मेल आयडी, जन्मतारीख, लिंग अथवा बायोमेट्रिक डेटा (फिंगरप्रिंट किंवा आयरिस) बदलून घेऊ शकता.

सध्याच्या घडीला किमान 19 फंक्शनल आधार सेवा केंद्रे आहेत. आधार जारी करणार्‍या संस्थेनं सन 2019च्या अखेरपर्यंत 53 शहरांमध्ये 114 सेवा केंद्रे सुरू करण्याची योजना आखली आहे. यूआयडीएआयच्या माध्यमातून चालवल्या जाणार्‍या सेवा केंद्रांचा पत्ता किंवा अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी यूआयडीएआयच्या पोर्टलवर ’बुक अ‍ॅन अपॉइंटमेंट’ पेजला भेट द्यावी लागेल.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply