पनवेल : रामप्रहर वृत्त
करंजाडे येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यास महिलांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेविका चारुशीला घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. करंजाडे नोड महिला मोर्चा अध्यक्षा अॅड. प्रमिला ढौल यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. करंजाडे महिला कार्यकारिणी उपाध्यक्षा रश्मी गुप्ता, सरचिटणीस पूनम मिश्रा, भक्ती गुुुजर, अर्चना शिदु्रक, सदस्य श्वेता खरे, रेश्मा शिखरे, पूनम महाडिक, तसेच सावित्रीबाई फुले बचत गटाच्या सदस्यांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या वेळी चारुशीला घरत यांनी महिला कशा गुणसंपन्न असतात हे सांगितले, तसेच महिलांना पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन केले. रूपाली जोशी यांनी नृत्य सादर केले. अॅड. प्रमिला ढौल यांनी या वेळी महिलांना प्रोत्साहन दिले.