Breaking News

भारताविरुद्ध पोलार्डकडे धुरा, विंडीज संघाची घोषणा, अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन

केपटाऊन : वृत्तसंस्था

वेस्ट इंडिज संघाच्या आगामी भारत दौर्‍यासाठी टी-20 आणि वन-डे संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. 6 डिसेंबरपासून विंडीजच्या भारत दौर्‍याला सुरुवात होईल. या दौर्‍यात दोन्ही संघ प्रत्येकी तीन टी-20 आणि वन-डे सामने खेळतील. अपेक्षेप्रमाणे किएरॉन पोलार्डकडे विंडीजच्या संघाचे नेतृत्व देण्यात आलेले असून, काही जुन्या आणि अनुभवी खेळाडूंनीही संघात पुनरागमन केले आहे.

आगामी वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून वेस्ट इंडिजने हा संघ जाहीर केला आहे. वन डे आणि ट्वेंटी-20 अशा दोन्ही संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी किएरॉन पोलार्डच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. पोलार्डसह टी-20 संघात शेरफन रुथरफोर्ड आमि जेसन होल्डर यांचाही समावेश करण्यात आला आहे.

पाहुण्यांनी दमदार फलंदाजांची फौजच या मालिकेला पाठवली आहे. यात एव्हिन लुईस, शिमरोन हेटमायर, लेंडल सिमन्स, पोलार्ड आणि निकोलस पूरन यांचा समावेश आहे. गोलंदाजीत त्यांच्याकडे शेल्डन कोट्रेल, होल्डर, किमो पॉल आणि केस्रीक विलियम्स यांचा समावेश आहे.

– वन-डे संघ

किएरॉन पोलार्ड (कर्णधार), सुनील अँब्रिस, रोस्टन चेस, शेल्डन कॉट्रेल, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, एविन लुईस, किमो पॉल, खेरी पेरी, निकोलस पूरन, रोमारिओ शेफर्ड, हेडन वॉल्श ज्युनिअर.

– टी-20 संघ

किएरॉन पोलार्ड (कर्णधार), फॅबिअल अ‍ॅलिअन, शेल्डन कॉट्रेल, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, किमो पॉल, ब्रँडन किंग, एविन लुईस, खेरी पेरी, निकोलस पूरन, दिनेश रामदीन, शेर्फन रुदरफोर्ड, लेंडल सिमन्स, केसरिक विल्यम्स, हेडन वॉल्श ज्युनिअर.

भारत वि. विंडीज मालिकेचे वेळापत्रक

– ट्वेंटी-20 मालिका

6 डिसेंबर-हैदराबाद

8 डिसेंबर-तिरुवनंतपुरम

11 डिसेंबर-मुंबई

वन डे मालिका

15 डिसेंबर-चेन्नई

18 डिसेंबर-विशाखापट्टणम

22 डिसेंबर-कटक

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply