Breaking News

आमदार महेश बालदी यांच्याकडून जलजीवन मिशनचा आढावा

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल पंचायत समितीच्या कार्यालयात शुक्रवारी (दि. 24) जलजीवन मिशनची आढावा बैठक उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या बैठकीला बैठकीला गटविकास अधिकारी समीर वाठारकर, फॉरेस्ट अधिकारी एम.डी. राठोड, विनोद मावरे, जिल्हा विकास समन्वयक आणि सहनियंत्रण समिती सदस्य राजेंद्र पाटील, मंगेश वाकडीकर, हभप अनंत पाटील यांच्यासह 38 ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
या वेळी आमदार महेश बालदी यांनी, जनतेच्या हितासाठी आपण सर्वांनी काम केले पाहिजे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याची सुवर्णसंधी आपल्या सर्वांना मिळाली आहे. या योजनेत उद्भवणार्‍या समस्यांचे निराकरण करून नागरिकांपर्यंत पाणी कसे पोहचेल याचा विचार केला पाहिजे, असे म्हटले.

Check Also

महापालिका कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज …

Leave a Reply