पनवेल : रामप्रहर वृत्त
विधानसभा मतदार संघाचा मी जरी प्रतिनिधित्व करत असलो तरी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेहनतीने सदस्य नोंदणीचे लक्ष पूर्ण झाले आहे, आणि त्यामुळेच पनवेल विधानसभेने संपूर्ण महाराष्ट्रात सर्वोत्तम कामगिरी केली आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे केले.
76 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वैयक्तिक एक हजारपेक्षा जास्त सदस्य नोंदणी करणार्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते पनवेल भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. भाजपच्यावतीने संघटन पर्व अंतर्गत सदस्य नोंदणी अभियान राबविले जात आहे. यामध्ये पनवेल विधानसभा मतदार संघासाठी एक लाख 14800 सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते, हे लक्ष्य प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पूर्ण झाले.
पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी स्वतः पाच हजारांपेक्षा जास्त सदस्य नोंदणी केली तर कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी महापौर कविता चौतमोल, जिल्हा सरचिटणीस अॅड. प्रकाश बिनेदार, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ, स्थायी समितीचे माजी सभापती अमर पाटील, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, राजू सोनी, विकास घरत, माजी नगरसेविका सुशीला घरत, दर्शना भोईर, अरुणा भगत, प्रदीप भगत, वैद्यकीय सेलच्या ज्योती देशमाने, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, भाजपचे शहर उपाध्यक्ष सतीश पाटील, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, हरविंदर सिंग, हॅप्पी सिंग, उत्तम जरग, विजय पाटील किशोर चौतमोल यांनी एक हजार सदस्यांची नोंद केली असून या सर्वाचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन आमदार प्रशांत ठाकूर यांनी सत्कार केला.
या वेळी पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख व जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, सी. सी. भगत, जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा राजेश्री वावेकर, माजी नगरसेवक तेजस कांडपिळे, अजय बहिरा, समीर ठाकूर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, के.सी.पाटील, मधुकर उरणकर, जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, अमित ओझे, यतीन पाटील, कामगारनेते रवींद्र नाईक, केदार भगत, रुपेश नागवेकर, प्रीतम म्हात्रे, यमुना प्रकाश, सपना पाटील, सामना साठी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे बोलताना सांगितले की, 12 जानेवारीला शिर्डीमध्ये भाजप प्रदेशचा मेळावा झाला. त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट नमूद केले. त्यानुसार आपण सर्वांनी पनवेल विधानसभा मतदार संघात मेहनत घेऊन काम केले आहे. केंद्रात लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लोकहिताचे सरकार म्हणून काम होत आहे. त्यामुळे साहजिकच लोकांच्या अपेक्षा या सरकारकडून आहेत, त्याच अनुषंगाने त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून काम केले जात आहे. आपण पक्षाचा पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून विविध योजना त्याच्यापर्यंत पोहचविण्यासाठी आणि त्यांच्या समस्या दूर करण्याकरिता सतत दक्ष राहिले पाहिजे.
या सदस्य नोंदणीच्या उद्देशाने लाखो लोक आपल्याशी जोडली आहेत आणि यापुढे अधिक प्रमाणात जोडली पाहिजेत यासाठी काम करत राहा, असे आवाहन करून पक्ष सदस्य नोंदणीत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी आभार मानत पदाधिकारी, कार्यकर्ता, आणि नागरिकांच्या पाठबळामुळे आणि मेहनतीने वाटचाल सुरू असल्याचेही त्यांनी या वेळी म्हटले.
Check Also
वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …