Breaking News

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते जलजीवन मिशन योजनेंतर्गत येणार्‍या विकासकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद केणी, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, एकनाथ देशेकर, पंचायत समिती अध्यक्ष प्रकाश खेरे, अल्पसंख्याक रायगड जिल्हा उपाध्यक्ष नासिर शेख, पनवेल तालुका युवा मोर्चा सरचिटणीस सचिन पाटील ,सोशल मीडिया पनवेल तालुका उपाध्यक्ष अंकुश पाटील ,उल्हास पाटील, वावंजे पंचायत समिती युवा मोर्चा अध्यक्ष निलेश दाढावकर ,दशरथ पाटील, प्रकाश मुकादम, अरुण चोरमेकर, भूषण दाढावकर, प्रथमेश म्हात्रे, गुलशन पाटील, मयूर खेरे, चंद्रकांत पाटील, बाळा खैरे, कैलास मढवी, फोझन मान्सूरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply