पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र शासनाच्या रायगड सरस या प्रदर्शनाचे आयोजन पनवेल मध्ये गुरुवार (दि. 9) ते सोमवार (दि. 13) या दरम्यान पटवर्धन हॉस्पिटल समोरील गुजराथी शाळेच्या मैदानामध्ये केले आहे. या प्रदर्शनामध्ये स्वयं सहाय्यता समुहातील हस्तकला वस्तु व खाद्यपदार्थांचे विक्री व प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. तसेच या प्रदर्शनातील खास आकर्षण हे भारतातील सर्वात मोठा 11 फूट लांबीचा व सात फूट उंचीचा 1000 किलो वजन असलेला बैल पहावयास मिळणार आहे. या प्रदर्शनाचा प्रवेश हा विनामुल्य असून जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन येथील आयोजित कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.