Breaking News

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभेच्छा

माजी सरपंच रमेश पाटील यांच्याकडून विद्यालयासाठी स्वच्छतागृह

पनवेल : रामप्रहर वृत्त
रिटघर येथील श्री भैरवदेव विद्यालय आणि लोकनेते श्री रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातील एच एस सी आणि एसएससी विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी ह. भ. प. वैकुंठवासी शालुबाई सिताराम पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ माजी सरपंच रमेश पाटील यांनी विद्यालयासाठी तीन लाख 25 हजार रुपये खर्च करून उभारलेल्या स्वच्छतागृहाचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, दुंदरे सरपंच सुभाष भोपी, माजी सरपंच रमेश पाटील, विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमिटी सदस्य राजेश भोपी, बळीराम भोपी, वंदना भोपी, दीपक पाटील शांताराम चौधरी, विद्यालयाचे मुख्याध्यापक साळुंखे आदी उपस्थित होते. स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या तसेच मागील वर्षी इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत पहिले तीन आलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच नमो चषक 2025
स्पर्धेत 17 वर्षाखालील वयोगटातील विद्यालयाला चौथा क्रमांक मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांचा आणि क्रीडा शिक्षकांचा या वेळी सत्कार करण्यात आला. दरम्यान लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी चंद्रपूर येथे होणार्‍या खुल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी होणार्‍या निखिल भोपी याचा संपूर्ण खर्च करण्याचा आश्वासन निखिलला दिले आहे तसेच विद्यालयासाठी 10 स्मार्ट ब्लॅक बोर्ड उपलब्ध करून देणार आहेत. विद्यालयासाठी स्वच्छतागृह उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम दुंदरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश पाटील यांनी केल्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे कौतुकही केले.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply