Breaking News

कर्नाळा बँकेसंदर्भात शनिवारी पनवेलमध्ये महत्त्वपूर्ण बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त

कर्नाळा नागरी सहकारी बँकेने घोटाळा केल्याचे उघडकीस आल्याने खातेदार, ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण वाढतच आहे. या घोटाळ्यामुळे अनेक ठेवीदार व खातेदारांना पैसे मिळत नाहीत. यासंदर्भात ठेवीदार व खातेदारांना मार्गदर्शन करण्यासाठी येत्या शनिवारी (दि. 14) सकाळी 10.30 वाजता पनवेल मार्केट यार्ड येथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात होणार्‍या या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी हे ठेवीदार व खातेदारांना मार्गदर्शन करणार आहेत.

कर्नाळा बँकेच्या पनवेल, खारघर, महाड अशा वेगवेगळ्या शाखा आहेत. या शाखांमधून गेल्या तीन ते चार महिन्यांमध्ये व त्याच्याही आधीपासून खातेदारांना त्यांच्या मुदत ठेवींचे पैसे न देणे, चालू खात्यावरील पैसे देण्यालाही विरोध होणे, आरटीजीएससाठी मोठमोठ्या रांगा लावल्यानंतरही ते न होणे अशा तक्रारी वारंवार येत आहेत. या बँकेत बोगस खाती उघडून शेकडो कोटी रुपयांचे कर्ज संचालक मंडळाने लंपास केल्याचेही उजेडात आले आहे. याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) विशेष लेखापरीक्षण करून सहकार आयुक्तांना अहवाल दिला होता. सहकार आयुक्तांनी या अहवालाची तपासणी करून हा घोटाळा झाल्याचे स्पष्ट केले आहे.

कर्नाळा बँकेच्या घोटाळेबाज कारभारामुळे अनेक महिन्यांपासून ठेवीदार, खातेदारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे ठेवीदार, खातेदार हवालदिल झाले आहेत. त्यांना पैसे मिळवून देण्याकरिता प्रसिद्ध सनदी लेखापाल व माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे शनिवारी होणारी बैठक महत्त्वपूर्ण असणार आहे. बैठकीस संबंधित खातेदार, ठेवीदारांनी उपस्थित

राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply