Breaking News

चिखले-उसर्ली रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा नियोजन निधीतून पनवेल तालुक्यातील चिखले ते उसर्ली रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि. 9) करण्यात आले.

पनवेल मतदारसंघाचा सर्वांगीण व शाश्वत विकास व्हावा याकरिता आमदार प्रशांत ठाकूर सदैव प्रयत्नशील असतात. शहराप्रमाणे गावातही विकासाची गंगा पोहचली पाहिजे अशी त्यांची भूमिका असते. मतदारसंघातील पायाभूत सुविधांकडे विशेष लक्ष देत त्या पूर्ण करून घेण्यावर त्यांचा भर असतो. अशाच प्रकारे चिखले ते उसर्ली रस्त्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नातून होत आहे.

या भूमिपूजन समारंभास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, चिखले ग्रामपंचायतीचे सरपंच नामदेव पाटील, उपसरपंच रवींद्र गडकरी, सदस्य विनायक पाटील, रवींद्र पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते शांताराम पाटील, पांडुरंग केणी, योगेश पाटील, हिरामण पाटील, राम फडके, गोमा पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply