Breaking News

पेणच्या गणेशमूर्तिकारांनी घेतली आमदार महेंद्र दळवी यांची भेट

पेण : प्रतिनिधी
पेणच्या श्री गणेश मुर्तीकारकांनी आपल्या विविध मागण्या तसेच पीओपी वरील बंदी कायमची उठविण्याची मुख्य मागणी घेऊन उपजिल्हाप्रमुख रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमदार महेंद्र दळवी यांची त्यांच्या निवासस्थानी
भेट घेतली. गेल्या काही वर्षांपासून पेणच्या गणेश मुर्तीकारांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे. पेण शहरासह तालुक्यातील शेकडो तरुण या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र पीओपी बंदीमुळे भविष्यकाळात या व्यवसायावर गदा येऊ शकते. त्यामुळे गणेश मुर्तीकार मालकांसह कामगार चिंतीत झाला आहे. त्यामुळे मूर्तिकारांनी या संदर्भात उपजिल्हाप्रमुख रुपेश पाटील नेतृत्त्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार महेंद्र दळवी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी गणपती कारखानदार ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता, बँकांच्या कर्जाचे ओझे अशा अनेक समस्यांना तोंड देत खडत – ररखडत आपला व्यवसाय सांभाळत असून पीओपी बंदीमुळे आगामी काळात या व्यवसायावर गदा येण्याची चिन्हे दिसत आहेत. या पारंपरिक व्यवसायाला कुठेतरी न्याय मिळावा यासाठी शासन दरबारी आमचे गार्‍हाणे मांडावे या मागणीचे निवेदन यावेळी गणपती कारखानदार व कामगारांनी आमदार महेंद्र दळवी यांना दिले.
यावेळी झालेल्या चर्चादरम्यान आमदार महेंद्र दळवी, जिल्हा संपर्कप्रमुख प्रकाश देसाई, जिल्हाप्रमुख राजा केणी उपस्थित होते. लवकरच मुर्तीकारांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार यांच्यासह इतर शिष्टमंडळासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घडवून आणणार असल्याचे आमदार महेंद्र दळवी यांनी बोलताना सांगितले.
यावेळी उपजिल्हा प्रमुख रुपेश पाटील, श्री गणेश मूर्तिकार संघटनेचे हमरापूर विभाग अध्यक्ष किरण दाभाडे, हमरापूर ग्रामपंचायतीचे सरपंच राकेश दाभाडे, कळवे ग्रामपंचायतीचे सरपंच सतिश पाटील, माजी अध्यक्ष कुणाल पाटील, निकिता पाटील, राजन पाटील, संजय पाटील, विनोद नाईक सचिन गतिमडे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply