Breaking News

खवल्या मांजराची विक्री करणार्यास अटक

पनवेल : बातमीदार, वार्ताहर

दुर्मीळ अशा वन्यप्राणी खवल्या जातीच्या मांजराची तस्करी व विक्री करणार्‍या व्यक्तीस खांदेश्वर पोलिसांनी गाडीसह अटक केली आहे. वन्यप्राण्याची तस्करी व विक्री करण्याच्या उद्देशाने एक इसम आसूडगाव बसस्टॉपजवळ येणार असल्याची माहिती खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्याम शिंदे यांना मिळताच पोलीस निरीक्षक (गुन्हे) धुळबा ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक संदीप माने, जुईकर, पोलीस हवालदार अनिल पाटील, पोलीस नाईक दीपक डोंगरे, पोलीस शिपाई युवराज शिवगुंडे, दिगंबर सलगर, सचिन सलगर, अमोल कोळी आदींच्या पथकाने सापळा रचून आरोपी कल्पेश गणपत जाधव (28, रा. कळमणी खुर्द, ता. खेड) याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे असलेल्या लाल रंगाच्या टाटा सुमो ग्रॅड वाहनामध्ये रिकाम्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये साधारण तपकिरी रंगाचा खवल्या मांजर जातीचा वन्यप्राणी आढळून आला. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डेंनी सांगितले की, धनदौलत व ऐश्वर्य मिळते या गैरसमजापोटी वन्यप्राण्यांची तस्करी व विक्री करण्याचा काही जण प्रयत्न करीत असतात. असे प्रकार करणारे आढळल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply