पनवेल : रामप्रहर वृत्त
महायुतीचे सरकार येणार आणि सर्व योजना सुरू राहणार, असे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने पनवेल तालुका ग्रामीण आणि शहर यांच्या आयोजित जाहीर मेळाव्यावेळी दिले.
रविवारी (दि.27) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ मार्केट यार्ड येथे हा जाहीर मेळावा झाला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, संपूर्ण देशांमध्ये भारतीय जनता पक्ष सर्वसामान्यांच्या गरीब माणसाची सेवा करण्यासाठी काम करीत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने विविध योजना सर्वसामान्यांसाठी राबवले आहेत. त्यामुळेच भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या पाठीशी सर्वसामान्य माणूस उभा राहतोय. याउलट महाविकास आघाडीचे नेते लाडकी बहीण योजना बंद करण्याची भाषा करत आहेत, पण मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की, या पुढेही महायुतीचे सरकार येणार आहे. सरकारने ज्या योजना चालू केल्या आहेत त्याचा लाभ तुम्हाला पुढल्या काळात मिळेल राहील.
या मेळाव्याला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपचे गोवा प्रदेश महामंत्री तथा माजी आमदार दयानंद सोपटे, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उत्तर रायगड जिल्हा भाजपचे सरचिटणीस प्रकाश बिनेदार, उत्तर रायगड जिल्हा भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष अमित जाधव, माजी महापौर कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेविका दर्शन भोईर, वृषाली वाघमारे, अविनाश गायकवाड, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, संजय पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, रावसाहेब खरात, अमोल जाधव, रवी रत्नपारखे, अविनाश गायकवाड, चेतन जाधव, संजय जाधव, मधुकर उरणकर, अनंत गायकवाड संतोष मस्के यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 523, उसरली खुर्द सिद्धांत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला क्रीडा संस्था, पनवेल ऑल इंडिया पँथर सेना पनवेल तालुका यांच्या वतीने पनवेल विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला तसे पत्र या संघटनेंनी आमदार प्रशांत ठाकूर यांना दिले. या वेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची वेगवेगळ्या पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाधिकार्यांना या मेळाव्यादरम्यान नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले.
Check Also
‘दिवाळी पहाट’ने पनवेलकर मंत्रमुग्ध महापालिकेकडून मतदान जनजागृती
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि. 1) पहाटे वडाळे तलाव परिसरात आयोजित …