Breaking News

शेतकरी संघटनेतर्फे केळी लागवड संकल्प

मोहोपाडा : प्रतिनिधी

खालापूर तालुक्यातील सुभाष मुंढे यांनी आपल्याजवळ असलेल्या शेतीमधून अल्प प्रमाणात केळी लागवड करुन त्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले गेले. केळी लागवड करुन त्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेवू शकतो या बाबीचा विचार करुन वांवढळ येथील असलेल्या एका फॉम हाउस येथे असलेल्या पडीक जागेमध्ये केळी लागवड करण्याचा संकल्प वांवढळ शेतकरी संघटनेने केला आहे.

गेले अनेक वर्ष आपण कोठेतरी जागा घेवून केळी लागवड केली पाहिजे. हा विचार करण्यात आला. मात्र वेळोवेळी तांत्रिक अडचण आणि कोणाचे सहकार्य मिळत नसल्यामुळे हा प्रकल्प रेंगाळत होता. शिवाय केळी लागवड म्हटले की, प्रथम पाण्याची सोय होणे अतिशय महत्वाची आहे. शिवाय पाण्याशिवाय आपण शेती अथवा कोणतेही पिक घेवू शकत नाही. त्याचबरोबर सौर उर्जेवर हवे तेवढे पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे ज्या ठिकाणी जवळच पाणी असेल अशा ठिकाणी आपण ती केळी लागवड केली पाहिजे हे उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून वांवढळ येथे केळी लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला.

कोणतेही काम करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असते हाच विचार करून खालापूर तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी यांनी जागेचे आणि पाण्याचे नियोजन करुन वांवढळ येथे केळी लागवड करणाची सहमती दर्शवली. या वेळी शेतकरी संघटनेचे खालापूर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुभाष मुंढे, प्रमोद पवार, अविराज बुरूमकर, बाळकृष्ण लबडे, अविनाश आमले, रामचंद्र मिसाल, समिर पिंगळे, दिनेश शिंदे, सुनिल कुरुंगले, भरत साळुंखे, राजेंद्र मोरे, संतोष दळवी, तसेच शेतकरी वर्ग उपस्थित होते.

कोकणात केळी अल्प प्रमाणात होत असल्यामुळे मी स्वत: जागेवर हा प्रयोग केला आणि काही महिन्यात मला उत्तमप्रकारे केळी लागवड करुन मिळाली, यामुळे त्यांची विक्रीतून नफा मिळाला या माध्यमातून लागवड कशी केली पाहिजे त्यांची निगा, खतपाणी या सर्व बाबीचा अभ्यास केला यामुळे खालापूर तालुक्यात उत्तमप्रकारे केळ्याचे उत्पन्न घेवू शकलो. – सुभाष मुंढे, अध्यक्ष, खालापूर तालुका शेतकरी संघटना

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply