शेणगाव शाळेला एलईडी टीव्ही भेट
खोपोली : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील डोलवली गावाच्या हद्दीतील झोराबियन चिक्स प्रा. लि. कंपनीने शेणगाव गावातील प्राथमिक शाळेला एलईडी टीव्ही संचाची भेट दिली. तसेच माणकीवली ग्रामपंचायती करीता 15 एचपी क्षमतेचा पंप आणि पाईपलाईन असा एकूण सुमारे तीन लाख 50 हजार रुपयांची मदत केल्याने या कंपनीच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. माणकिवलीचे सरपंच चंदन भारती व त्यांच्या सहकार्यांच्या मागणीवरुन झोराबियन कंपनीने ग्रामपंचायतीकरीता पंप व पाईप लाईन आणि या ग्रामपंचायत हद्दीतील शेणगाव येथील प्राथमिक शाळेला एलईडीटिव्ही संचाची भेट दिली. समाजाचं आपण काही तरी देणं लागतो, या भावनेतून प्रत्येकाने शक्य होईल, असे कार्य केल्यास समाजाची प्रगती होण्यास मदत होते. अशा सामाजिक कार्यातून मनाला समाधान मिळत असल्याने झोराबियन कंपनी हे कार्य करीत आहे, आणि यापुढेही करीत राहणार, असे कंपनीचे मालक झोराबियन शेठ यांनी यावेळी सांगितले. या वेळी कंपनीचे मॅनेजर उदय गुरव, सरपंच चंदन भारती, उपसरपंच अजय भारती, ग्रामपंचायत सदस्य रोशन देशमुख, दिप्ती देशमुख, भावना देशमुख, धनंजय देशमुख, ग्रामसेवक चव्हाण यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.