Breaking News

मुंबई -पुणे महामार्गावर नियमबाह्य धवणार्‍यासात बसेसवर पनवेल आरटीओची कारवाई

पनवेल : वार्ताहर
मुंबई पुणे महामार्गावर पनवेल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांच्या पुढाकाराने विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत असून पहिल्याच दिवशी सात बसेसवर कार्यवाही करण्यात आली आहे.
समृद्धी महामार्गावर नुकत्याच झालेला भीषण अपघातात अनेक जणाना जिव गमवावे त्याच पार्श्वभूमीवर पनवेल आरटीओ अँक्शन मोडवर आलेले असून पहिलाच दिवशी आरटीओ निरीक्षक संदीप कोतकर यांनी खारघर आणि कामोठे टोल नाक्यावर खाजगी बसेसची तपासणी करून सात बसेसवर कार्यवाही करण्यात आली आहे. यात चालकांचे ब्रिथ आणलायझर या उपकरणाद्वारे तपासणी करण्यात आली असता एक बसचालक मद्यप्राशन केल्याचे समोर आले. तसेच या मोहिमेत आपत्कालीन दरवाजा, फर्स्ट एड बॉक्स अग्निशामक यंत्रणा, तात्पुरता परवाना, वाहनांचे योग्यता प्रमाणप्रत्र, लाल परावर्तक,प्रशेर हॉर्न, डाझलिंग लाईट, वायपर या गोष्टी सुस्थितीत आहेत की नाही याची तपासणी करण्यात आली तसेच अवैध मालवाहतुक बसमधून होत आहे का नाही हेही तपासण्यात आले.
वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येत असून जो कोणी दोषी असेल त्यावर योग्य ती कार्यवाही आम्ही करणार आहोत. यामध्ये कोणालाही दया आणि माफी मिळणार नाही. समृद्धी महामार्गावर झालेला अपघातासारखी घटना पुन्हा होऊ नये याची खबरदारी म्हणुन ही कार्यवाही आम्ही करत आहोत, असे पनवेल आरटीओ निरीक्षक संदीप कोतकर यांनी सांगितले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply