कामोठ्यात हळदी-कुंकू समारंभ उत्साहात
कामोठे : रामप्रहर वृत्त
येथील श्री वरदविनायक भाजीविक्रेता सामाजिक संस्थेच्या वतीने हळदी-कुंकू समारंभ उत्साहात झाला. वर्षा प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास महापौर डॉ. कविता चौतमोल आणि अर्चना परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात महिलांनी एकत्र येऊन एकमेकींना सतीचे वाण दिले. आयोजकांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, नगरसेविका संतोषी तुपे, पुष्पा कुत्तरवाडे, मोनिका महानवर, भाजप कार्यकर्त्या मंगला तुपे, स्वाती किंद्रे, मनीषा वणवे, लता घोडगे, आशा नलावडे, शोभा जाधव, छाया धडस, वैजयंता भाईंगडे आणि समस्त भाजीविक्रेता महिला मंडळ व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत नलावडे (माऊली) यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते संदीप तुपे, प्रभाग 11चे अध्यक्ष रमेश तुपे, विजय झंझाड, राजकुमार जाधव, ज्येष्ठ नेते अशोक फाळके. श्री. बांबुर्डे, श्री. उंडे, दत्ता वाफारे, शिवाजी भोसले आदींनी उपस्थित राहून कार्यक्रमास सहकार्य केले.