नवी मुंबई : बातमीदार
माजी नगरसेवक गणेश म्हात्रे यांच्या प्रयत्नाने सीवूडस सेक्टर 44 आणि 46 येथे विविध ठिकाणी हायमास्ट दिवे बसवण्यात आले असून आता हे परिसर प्रकाशाने उजळून निघाले आहेत. सिस्ट 46 ए मध्ये गेहलोत मॅजेस्टिक सोसायटीसमोर आणि सेक्टर 44 ए केशवकुंज सोसायटीसमोर हायमास्ट दिवे बसवण्यात आले आहेत. या हायमास्टचे लोकार्पण माजी महापौर सागर नाईक यांच्या हस्ते माजी नगरसेवक विनोद म्हात्रे यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी सेवाधारी ज्येष्ठ नागरिक, तसेच आबा कांबळे, अशोक कुंडे, सीताराम रोकडे, राकेश तांडेल, अजित भोईर, सुरज पोटे, राम पवार, शांताराम खरे, आप्पा कुलकर्णी, सुधाकर डोरनाल, संतोषी म्हात्रे, शीतल म्हात्रे, ज्योती परदेशी, मीरा बिस्ट, ज्योती पाटील यासह नागरिक उपस्थित होते.