![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2020/02/amruta-dharap-1-1024x683.jpg)
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल येथील श्री रामदास (मारूती) मंदिर या संस्थेचा प्रतिवर्षाप्रमाणे श्री रामदास नवमी उत्सव 2020 दि. 10 ते 17 फेब्रुवारी या कालावधीत देवालयाच्या भव्य सभा मंडपात वर्ष 103 वा साजरा करण्यात येत आहे. या मंगलमय उत्सवाच्या निमित्ताने सुश्राव्य किर्तन, चक्रीभजन, प्रवचन, शास्त्रीय व सुगम भक्तिसंगीत इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. संगीतकार श्रीधर फडके व पनवेलच्या नाटयसंगीतकार कै. भाग्यश्री बापट यांच्या शिष्या अमृता धारप-पनवेल व त्यांचे सह कलाकार यांचा संगीताचा भक्तिरसधारा व नाटयसंगीताचा बहारदार श्रवणीय कार्यक्रम पुष्प 2 मंगळवारी (दि. 11) आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरूवात शाम कल्याण या शास्त्रोगत् रागाने व संगीत स्वयंवर या नाटकामधील नरवर कृष्णा समान या नाट्यगीताने गायक कोमल कुलकर्णी यांच्या सुमधुर सुरेल काव्य पंक्तीने सुरूवात झाली. त्रिभंगी देहूडा-अगा हे विश्व नायका-मारूतीचे नाम-राधा धर मधू मिलींद अशा अभंगवाणी व भक्तिगीत अमृता धारप यांच्या सुरांच्या सुमधुर सुरावरांनी कार्यक्रमाची रंगत वाढत होती.गायक व गायिकेच्या संगीत साथीला संवादिनीवर अथर्व देव (पेण), तबला-पकवाज-आदित्य उपाध्ये, ओमकार भुवड, झांज वादक-केदार बापट पनवेल यांनी आपल्या वाद्यवृंद संगीताद्वारे अभगंवाणीचे ताल-सुरेल साथीमुळे तसेच निवेदिका वैशाली केतकर-नवीन पनवेल यांच्या अध्यामिक, अभ्यासपूर्ण व सुरेल शब्दांकीत रसाळ सुमधुर वाणीमधील शब्दांकनातील निवेदनामुळे कार्यक्रमाला अधिकच उठावदारपणा आला.