लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त
सर्वसामान्यांचे आधारवड असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा येत्या 2 जूनला 71वा वाढदिवस आहे. त्या अनुषंगाने पनवेल तालुक्यातील जासई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून 100 हून अधिका नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
पनवेल तालुक्यातील जासई येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत आरोय शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून तपासणी तसेच नागरीकांना मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिराच्या वेळी जासई विभागीय अध्यक्ष गोपीनाथ म्हात्रे, कामगार नेते सुरेश पाटील, उत्तर रायगड उपाध्यक्ष नीलकंठ घरत, जासईचे सरपंच संतोष घरत, गाव अध्यक्ष सुनील घरत, अमृत ठाकूर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपसभापती गणेश पाटील, उरण तालुका युवा मोर्चा सरचिटणीस तेजस पाटील, युवा नेते भूषण म्हात्रे, गणेश घरत, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.