समाधी वास्तुचे उद्या लोकार्पण; उमरठ सज्ज
पोलादपूर : प्रतिनिधी
तालुक्यातील उमरठ या गावी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी शौर्य दिन आणि पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त रविवारी (दि. 16) विविध कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे, तर दुसर्या दिवशी 17 फेब्रुवारीला नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलार मामा यांच्या संयुक्त समाधीच्या नूतनीकरणाच्या वास्तूचे लोकार्पण केले जाणार आहे.
या सोहळ्याला सर्वपक्षीय नेतेमंडळींसह ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या बहुचर्चित हिंदी चित्रपटाचे प्रमुख कलाकार अजय देवगन, काजोल, शरद केळकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या वेळी यंदाचा नरवीर तानाजी मालुसरे 2020 पुरस्कार या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती तानाजी मालुसरे उत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.