पनवेल : रामप्रहर वृत्त
महापालिकेच्या वतीने महापालिका हद्दीमध्ये विविध विकासकामे सातत्याने करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत पनवेलमधील मच्छी मार्केटचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.
पनवेल महापालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामे सातत्याने करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने पनवेल कोळीवाडा येथील मच्छी मार्केट दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यामध्ये मच्छी मार्केटमधील फ्लोअरिंग, सिलिंग दुरुस्ती आणि कलरिंगचे काम करण्यात येणार आहे, तसेच या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या मच्छी मार्केटची पाहणी केली व येथील समस्या जाणून घेतल्या. मच्छी मार्केटच्या दुरुस्तीच्या कामाच्या भूमिपूजनावेळी पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, प्रभाग समिती ‘ड’चे अध्यक्ष राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, मुग्धा लोंढे, माजी नगरसेविका सुनंदा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मच्छी मार्केटच्या दुरुस्तीच्या कामासंदर्भात सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या वेळी अधिक माहिती दिली.