Breaking News

गव्हाणच्या विद्यालय व महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

अरूणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त

गव्हाण येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेज येथे बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन व निरोप समारंभ सोहळा शनिवारी (दि. 15) झाला. या कार्यक्रमास रयतचे जनरल बॉडी सदस्य तथा स्कुल कमिटीचे चेअरमन, भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. समारंभावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीच्या परिक्षेसाठी व पुढील करिअरसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास गव्हाणच्या सरपंच हेमलता भगत, सदस्य विजय घरत, न्हावा शेवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रमोद जाधव, स्कुल कमिटी सदस्य अनंता ठाकूर, विश्वनाथ कोळी, वसंत पाटील, जयवंत देशमुख, सुधीर ठाकूर, दामोदर भोईर, भाऊ भोईर, रघुनाथ देशमुख, राजुशेठ देशमुख, अ‍ॅड. रुपेश म्हात्रे, विद्यालयाच्या प्राचार्या एस. ए. डोईफोडे, उपप्राचार्य आर. एल. चौरे, पर्यवेक्षक डी. डी. भर्णुके, ज्युनिअर कॉलेज विभागप्रमुख बी. पी. पाटोळे, गुरुकुल प्रमुख एस. के. भोईर, अटल टिंकरिंग प्रमुख आर. एस. भोईर, रयत बँक सातारा संचालक पी. ए. कोळी, रंधवे सर यांच्यासह शिक्षकवृंद आणि बारावीचे विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply