कर्जत : बातमीदार
कर्जत मेडिकल असोसिएशन (केएमए)च्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील डॉक्टर मंडळींची क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. नेरळ येथील कोतवालवाडी ट्रस्टच्या मैदानावर या स्पर्धेला रविवारी (दि. 16) सुरुवात झाली.
स्पर्धेचे उद्घाटन रायगड जि. प. सदस्य आणि कोतवालवाडी ट्रस्टच्या व्यवस्थापकीय संचालक अनसूया पादीर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभास नेरळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच शंकर घोडविंदे, कर्जत मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. गणेश साळुंखे, सचिव डॉ. संदीप माने, खजिनदार डॉ. संजीवकुमार पाटील, तसेच डॉ. निलेश म्हात्रे, ज्येष्ठ डॉ. सुहास शितुत आदी प्रमुख उपस्थित होते.
या आगळ्यावेगळ्या क्रिकेट स्पर्धेचा महिला डॉक्टरांच्या सामन्याने प्रारंभ झाल. स्पर्धेत कर्जत मेडिकल असोसिएशनचे दोन आणि बदलापूर मेडिकल असोसिएशनचा एक असे तीन महिला डॉक्टर संघ, तर पुरुषांचे सहा संघ सहभागी झाले आहेत. सामने साखळी पद्धतीने खेळविले जात आहेत.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …