मुंबई : प्रतिनिधी
आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे बिगुल अखेरीस वाजलेले आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने वेळापत्रकाची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी काही संघानी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात 29 मार्च रोजी सलामीचा सामना रंगणार आहे. इएसपीएनक्रिकइन्फो संकेतस्थळाने या संदर्भातील वृत्त दिले आहे.
मार्च महिन्यात भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळेल. 18 मार्च रोजी कोलकात्यात तिसरा सामना खेळवल्यानंतर बरोबर 11 दिवसांनी आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. या हंगामात शनिवारच्या दुहेरी सामन्यांची संख्या कमी करण्यात आलेली असून, संपूर्ण हंगामात केवळ पाच डबल हेडर सामने खेळवले जाणार असून, ते रविवारी दुहेरी पर्वणी कायम असेल. 17 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध अखेरचा साखळी सामना खेळणार आहे.
Check Also
अलबेला @ ७५ वर्षे भोली सुरत दिल के खोटे….
काही चित्रपट चित्रपटगृहातून उतरतात, काळ पुढे सरकत राहतो, बराच पुढे सरकतो. चित्रपट रसिकांच्या किमान तीन …
RamPrahar – The Panvel Daily Paper