पनवेल : रामप्रहर वृत्त
मध्यप्रदेश राज्यात नुकत्याच झालेल्या नवव्या गोशिनरियू राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशीपमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. याबद्दल त्यांचे संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक केले.
सीकेटी विद्यालयाच्या अर्थव जाधव आणि सम्यक जाधव यांनी कराटे स्पर्धेत सात ते आठ वर्षे वयोगटात यश मिळविले आहे. त्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले. या वेळी ‘सीकेटी’च्या मुख्याध्यापिका उज्ज्वला कोटियन, स्वप्नील भोईर उपस्थित होते.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …