नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अॅपवरील फॉलोअर्सची संख्या पाच कोटी इतकी झाली आहे. इन्स्टाग्रामवर एवढा मोठा टप्पा गाठणारा विराट हा पहिला भारतीय ठरला आहे.
क्रिकेटच्या मैदानावर सामन्यागणिक विक्रम करणार्या विराटने आता सोशल मीडियावरही सर्वोच्च स्थान मिळवले आहे. विराटच्या फॉलोअर्सची संख्या इतकी आहे की त्याच्या आसपासदेखील कोणी नाही.इन्स्टाग्रामवर असलेल्या अधिकृत अकाऊंटपैकी सेलिब्रिटींमध्ये पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो हा पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे 20 कोटी (200 मिलियन) फॉलोअर्स आहेत.