Breaking News

निशांत शेट्टीने मोडला श्रीनिवास गौडाचा विक्रम

बंगळुरू : वृत्तसंस्था

कर्नाटक राज्यात बैलांसोबत शेतामध्ये पळण्याच्या शर्यतीत श्रीनिवास गौडा या तरुणाने 9.55 सेकंदात 100 मीटरचे अंतर पार केले आणि देशभरात सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले. प्रसारमाध्यमांनी श्रीनिवासला भारताचा उसेन बोल्ट असेही नाव दिले. अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी सोशल मीडियावर श्रीनिवासचे कौतुक केले, मात्र काही दिवसांतच याच कंबाला शर्यतीत निशांत शेट्टी नावाच्या तरुणाने श्रीनिवासचाही विक्रम मोडत सर्वोत्तम वेळ नोंदवली आहे.

वेणूर भागात झालेल्या शर्यतीमध्ये निशांत शेट्टीने 9.51 सेकंदात 100 मीटरचे अंतर पार केले. काही दिवसांपूर्वी श्रीनिवासच्या नावे हा विक्रम जमा होता. श्रीनिवासच्या कामगिरीची दखल घेत केंद्रीय क्रीडा मंत्रि किरेन रिजिजू यांनी त्याच्यासाठी ‘साई’मध्ये ट्रायलची सोय केली होती, पण श्रीनिवासने आपल्याला अ‍ॅथलिट बनण्यात रस नसल्याचे सांगत पारंपरिक कंबाला शर्यत खेळण्याचा मानस असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर श्रीनिवासचे नाव चर्चेत

आल्यानंतर मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या हस्ते श्रीनिवासचा सत्कारही करण्यात आला होता.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply