Breaking News

भारतीय महिलांचा थरारक विजय अखेरच्या चेंडूवर वेस्ट इंडिजवर मात

सिडनी : वृत्तसंस्था

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी झालेल्या सराव सामन्यात भारतीय खेळाडूंनी वेस्ट इंडिज संघावर थरारक विजयाची नोंद केली. अखेरच्या चेंडूवर विंडीजला जिंकण्यासाठी दोन धावा असताना भारताच्या गोलंदाजाने विकेट मिळवली आणि विजय साकारला.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण हा निर्णय भारतीय संघासाठी फारसा चांगला दिसत नव्हता, कारण भारताच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताकडून सर्वाधिक धावा तळाची फलंदाज असलेल्या शिखा पांडेने केल्या. भारताकडून सर्वाधिक धावा झाल्या होत्या 24. वेस्ट इंडिजच्या भेदक गोलंदाजीपुढे भारताला 20 षटकांमध्ये 8 फलंदाजांच्या मोबदल्यात 107 धावाच करता आल्या होत्या.

आव्हान जरी लहान वाटत असले तरी ते वाचवण्यासाठी भारतीय गोलंदाजांनी शर्थीचे प्रयत्न केले. अखेरच्या चेंडूवर वेस्ट इंडिजच्या संघाला दोन धावांची गरज होती. या चेंडूवर दोन धावा निघाल्या असत्या तर विंडीज संघ विजयी झाला असता आणि एक धाव निघाली असती, तर सामना टाय झाला असता. भारताची गोलंदाज पूनम यादव शेवटचे षटक टाकत होती. पूनमने अखेरचा चेंडू टाकला आणि वेस्ट इंडिजच्या फलंदाज महिलेने तो फटकावला, पण हा चेंडू भारताच्या वेद कृष्णमूर्तीच्या हातात जाऊन विसावला. अशा प्रकारे भारताने थरारक विजयाची नोंद केली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply